श्री कृष्ण पाळणा:
पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ
कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो……………..॥धृ॥
दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग
जसा झळकतो आरशाचा भिंग..॥२॥
तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायांनो उठा
खारीक खोबरं साखर वाटा ……..॥३॥
चौथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयेनं वाजविली टाळी
कृष्ण जन्मला यमुना तळी ……..॥४॥
पाचव्या दिवशी सटवाईचा वेढा लिंबू नारळ देवीला फोडा
तान्ह्या बाळाची द्रुष्ट गं काढा………॥५॥
सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालते वारा
चला यशोदा आपुल्या घरा ……..॥६॥
सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल
यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोलं ..॥७॥
आठव्या दिवशी आठवीचा थाट भूलल्या गवळणी तीनशे साठ
श्री कृष्णाची पाहतात वाट ………॥८॥
नवव्या दिवशी नवतीचा फंद तान्ह्या बाळाने घेतला छंद
वासुदेवाचा सोडवावा बंध ………॥९॥
दहाव्या दिवशी भाग्येची रात तेहतीस कोटी देव मिळूनी येती
उतरून टाकती माणिक मोती ….॥१०॥
अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले
मथुरा नगरीत देवकीचे हाल …..॥११॥
बाराव्या दिवशी बाराच नारी पाळना बांधिला यशोदा घरी
त्याला लावली रेशमी दोरी …….॥१२॥
तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्मला यमुना तळी
गवळणी संगे लावितो खळी ….॥१३॥
चौदाव्या दिवशी तोफा गर्जती शंकर पार्वती नंदिवर येती
बाळाच्या डोळ्यात काजळ घालती ॥१४॥
पंधराव्या दिवशी नौबत वाजे श्रीकृष्णावरती घातला साज
यशोदा मातेला आनंद आज …॥१५॥
सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला
श्रीकृष्णाचा पाळणा गायीला जो बाळा जो जो रे जो…..॥१६॥
Read More Marathi Song Lyrics
- गांव सुटना Gaav Sutana Song Lyrics – BOYZ 4Gaav Sutana Song Lyrics काय सांगू राणी मला गाव सुटना कसं सांगू राणी मला गाव सुटना बंद गळ्यामंदी माझं मावेना ग अंगजीनच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंगमाणसांनी माणसांचे सोडले का रंग म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटनाकाय सांगू राणी मला गाव सुटना. पारी आली, सरी गेली, झाली त्याची तारी..पदव्यांच्या … Read more
- केवड्याचं पान तू Kevdyach Paan Tu Lyrics | Sarla Ek Koti | Ajay Gogavale, Aarya AmbekarKevdyach Paan Tu song from Marathi movie Sarla Ek Koti. Kevdycha Paan Tu song lyrics by Guru Thakur, music by Vijay Gawande and sung by Ajay Gogavale, Arya Ambekar. Starring Isha Keskar, Omkar Bhojne, Chhaya Kadam, Kamlakar Satpute, Ramesh Pardeshi, Vanita Kharat, Suresh Vishwakrama, Vijay Nikam, Abhijeet Chavan. Enjoy beautiful music of Sarala Ek Koti … Read more
- Sukh Kalale Lyrics | सुख कळले |Marathi Song | VEDEnjoy by Listening and Singing with Sukh Kalale Lyrics In Marathi and English along with Video Song On Youtube.This song is from VED Movie /Album.Singer is this song Shreya Ghoshal. Ajay – Atul has written the Lyrics of this song. Ajay – Atul is music composer of this song.Music lable is Desh Music. Sukh Kalale … Read more
- Tik Tik Vajate Dokyat Lyrics in MarathiLyrics of Tik Tik Vajate Dokyat is written by Mangesh Kangane. This song is sung by Sonu Nigam and Sayali Pankaj. This song is form the Duniyadari. Music for this song is given by Pankaj Padghan. Tik Tik Vajate Dokyat Song Details Tik Tik Vajate Dokyat Lyrics in Marathi टिक टिक वाजते डोक्यातधड धड वाढते … Read more
- Krishnacha Palna Marathi Lyricsश्री कृष्ण पाळणा:पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळकृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो……………..॥धृ॥ दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंगजसा झळकतो आरशाचा भिंग..॥२॥ तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायांनो उठाखारीक खोबरं साखर वाटा ……..॥३॥ चौथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयेनं वाजविली टाळीकृष्ण जन्मला यमुना तळी ……..॥४॥ पाचव्या दिवशी … Read more